शेकट्यात छापा मारुन तीन लाखांचा गुटखा जप्त, विशेष पथकांची कारवाई

Foto


औरंगाबाद- गुखाविक्री व साठवणुकीवर महाराष्ट्रात बंदी असतानाही अवैधरीत्या गुटख्याचा साठा ठेवणाऱ्या दोन बड्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने छापा मारून 3 लाखांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (ता.१२) रात्री करमाड जवळील शेकटा येथे करण्यात आली.

 

हाराष्ट्रात गुटखा उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी असताना देखील करमाड जवळील शेकटा येथील दोन व्यापारी परराज्यतून येणाऱ्या गुटख्याची साठवणूक करून ती जिल्यातील किरकोळ विक्रेत्यांना पुरवत असल्याची माहिती औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. या खात्रीलायक माहितीच्या आधारावर विशेष पथकाने सोमवारी रात्री सापळा रचून शेकटा येथील दोन दुकांनाच्या पाठीमागील गोडाऊन वर छापा मारला. त्या ठिकाणी पोत्यांमध्ये भरलेला सुमारे 3 लाख 7 हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे अद्याप समजू शकलेली नाही.